तालुक्यातील जानेगाव येथील रहिवासी यश कांबळे हा शेतकरी कुटुंबातील मुलगा केज शहरातील सौ. शांताबाई तापडिया पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेच्या या विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षा पात्रता परीक्षेसाठी कठोर परिश्रम घेत अभ्यास पूर्ण केला आणि मागच्या महिन्यामध्ये झालेल्या परीक्षेमध्ये यश संपादन करत त्याने नवोदय साठी पात्रता सिद्ध केली आहे.
सदरील यशाबद्दल त्याचे संस्थाप्रमुख डॉ. विजय तापडिया, प्रिन्सिपल स्वप्नील कडेकर यांच्यासह शांताबाई तापडिया पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले असून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.