#Social
विदर्भ संघटक व प्रसिद्धी प्रमुखपदी पंडित कदम…..!

यवतमाळ दि.७ – अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या विदर्भ संघटक व प्रसिद्धी प्रमुख पदी पंडित कदम यांची संस्थापक अध्यक्ष निवृत्ती डक पाटील यांनी नियुक्ती पत्र देऊन निवड केली. तसेच संघटनेच्या ध्येयधोरनानुसार काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
तर उर्वरित कार्यकारीणीमध्ये मराठवाडा कार्याध्यक्ष म्हणून शोभा वाकळे, मराठवाडा संघटक महिला आशा भादवे, जिल्हा संपर्क प्रमुख सतीश बचाटे, मराठवाडा कार्याध्यक्ष निखिल काळे तर तालुका संघटक म्हणून रामूकाका पठाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सदरील निवडीबद्दल नूतन कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.