आपला जिल्हा#Socialआरोग्य व शिक्षण
डॉ. संजय राऊत यांच्यासह डॉ. सदाशिव राऊत यांचा सत्कार….!

बीड दि.७ – जिल्हा रुग्णालयात महात्मा फुले युवा दलाच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सकपदी नुकतीच नियुक्ती झालेल्या डॉ. संजय राऊत आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकपदी नियुक्त झालेल्या डॉ. सदाशिव राऊत यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवा दलचे संस्थापक ऍड. सतीश शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सरपंच राजेंद्र राऊत, महात्मा फुले युवा दल पाटोदा तालुकाप्रमुख गणेश मोहळकर, डॉ. अक्षय भोपळे, रमेशभाऊ दुधाळ, सतीश कातखडे, युवा नेते दीपक भुजबळ, फैयाज पठाण, अमोल खिंवसरा आदी मान्यवर उपस्थित होते.