मंगळवार दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता महिला कला महाविद्यालय बीड येथे जिल्हा काँग्रेस पक्षातील संघटनात्मक फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली सदरील बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तर यावेळी युवनेते आदित्य पाटील आणि पक्ष निरीक्षक अमर खानापुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दरम्यान सदरील बैठकीत मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक फेर बदल करण्यात येणार असून कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. शेप यांनी केले आहे.