#Social
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सायकलींचे वाटप…..!

केज दि.९ — येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवाचे औचित्य साधून शिक्षणासाठी पायपीट कराव्या लागत असलेल्या गरजवंत विद्यार्थ्यांना दिपक कांबळे युवा मंचच्या वतीने सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे रंजित कांबळे आहेत.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्व वंदनीय भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलीत आणि वंचित समाजाला सांगितले की, शिक्षण हे वाघिणीचे दूध असून ती जे प्राशन करील तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असा मूलमंत्र दिला. तसेच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. मात्र आजही अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. अनेक गावात वाहनांची सोय नसते या सर्व बाबींचा विचार करून रंजित कांबळे यांनी भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना सायकली वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइंचे तालुकाध्यक्ष दिपक कांबळे, जिल्हा संघटक रविंद्र जोगदंड, जिल्हा सल्लागार उत्तम आप्पा मस्के, तालुका सरचिटणीस पत्रकार गौतम बचुटे, सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव बनसोडे, रमेश निशिगंध, सुरज काळे, रोहीत कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, कडुबाई खरात यांच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम हा दि. १० एप्रिल रोजी फुले नगर येथे संपन्न होत असल्यास ” तुम्ही खाता त्या भाकरीवर ” …फेम समाजभूषण कडुबाई खरात यांच्या कार्यक्रमात सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. कडुबाई खरात यांच्या भीम गीत कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे आणि उद्घघाटिका सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अंजलीताई घाडगे आहेत आणि प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष कबीरोद्दीन इनामदार, गोपाळ मस्के, बाळासाहेब भांगे, प्रा. धनराज भालेराव, आश्रुबा सोनवणे, रामधन हजारे, अमोल शिंदे, संदिप नाईकवाडे, प्रा. राजेश गायकवाड, संपत वाघमारे, लक्ष्मण थोरात, पत्रकार महादेव गायकवाड, गौतम बचुटे, रंजीत खोडसे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन एल एफ सी ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.