व्हायरल

वडिलोपार्जित झाडामुळे शेतकऱ्याचे नशीब फळफळले….!

10 / 100 SEO Score
बीड दि.११ – एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून करोडपती केले. ही बाब कुणाच्याही पचनी पडणार नाही. मात्र हे सत्य आहे यवतमाळ पुसद तालुक्यातील खुर्शी येथील एका  केशव शिंदे नामक शेतकऱ्याचे. एका वडिलोपार्जित झाडामुळे त्यांना अचानक ही लॉटरी लागली. न्यायालयात दाद मागितल्यानंतर या झाडाचे मूल्यांकन काढले तेव्हा ते 4 कोटी 97 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली नी एकच गहजब उडाला.
                 केशव शिंदे यांच्या 7 एकर वडिलोपार्जित शेतात एक झाड आहे. 2013 – 14 पर्यंत हे झाड कशाचे आहे हे शिंदे परिवाराला माहीतच नव्हते. 2013 14 मध्ये रेल्वे खात्याने एक सर्वे केला. त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले होते. त्यांनी हे झाड रक्त चंदनाचे असल्याचे आणि त्याचे मूल्य समजावून सांगितले. त्यावेळेस शिंदे परिवार एकदम चक्रावून गेला. त्यानंतर रेल्वेने भूसंपादन केले मात्र या झाडाचे मूल्य देण्यास रेल्वे खाते टाळाटाळ करत होते. त्यामुळे या परिवाराने या झाडाचे खासगी संस्थेकडून मूल्यांकन काढले. त्यावेळेस त्याचे मूल्यांकन 4 कोटी 97 लाख रुपये असल्याचे समोर आले. मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शिंदे कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात एक कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. आता त्यातील पन्नास लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर ते पैसे काढण्याची परवानगी शिंदे परिवाराला देण्यात आली आहे. सुरुवातीला शिंदे कुटुंबाने खाजगी अभियंत्याकडून रक्तचंदनाच्या झाडाचे मूल्यांकन काढले. मात्र ते जास्त असल्याने रेल्वे त्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा शिंदे यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केले.
           शंभर वर्षे जुन्या चंदनाच्या डेरेदार वृक्षाचा मोबदला म्हणून मध्य रेल्वेतर्फे एक कोटी रुपयाची रक्कम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा करण्यात आली त्यातील 50 लाख रुपये बँकेतून काढण्याची परवानगी नागपूर खंडपीठाने दिली. तसेच शिंदे यांना पूर्ण मोबदला देण्याच्या दृष्टीने त्या वृक्षाचे मूल्यांकन करण्याचे आदेश खंडपीठाने दिले.
        दरम्यान, वर्धा-यवतमाळ – नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी पंजाब शिंदे यांची शेत जमीन संपादित करण्यात आली आहे. मूल्यांकनानंतर उर्वरित रक्कम शेतकऱ्याला मिळेल. याचिकेवर न्यायमूर्ती अविनाश खरोटे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेतून 8 फेब्रुवारी 2018 रोजी पारित केलेल्या मोबदला रद्द करावा आणि लाल चंदनाचे वृक्ष व इतर वृक्षाविषयीचे आदेश गेल्या सुनावणीत दिले होते. त्यानंतर एक कोटी रूपयांची रक्कम न्यायालयात जमा केल्याची माहिती रेल्वेने न्यायालयात दिली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close