केज शिवारातील 167,174, 176, 185, 190 या सर्वे नंबर मधील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आवादा कंपनीचे काही लोक विनापरवानगी प्रवेश करत आहेत आणि त्या ठिकाणी उच्च वाहिनीचे टॉवर बसवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र सदरील उच्च दाबाच्या वाहिनी साठी सॅटेलाईट द्वारे या अगोदरच सर्वे करण्यात आलेला आहे. मात्र पुन्हा हे आवादा कंपनीचे लोक जबरदस्तीने शेतात घुसून जमिनी बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, पूर्वी सॅटॅलाइटच्या माध्यमातून झालेल्या सर्वेनुसार उच्च दाबाची वाहिनी बसवण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. सदरील आवादा कंपनीचे लोक जे गैरमार्गाने जमिनीचा जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर प्रतिबंध लावावा अशा मागणीचे निवेदन केजच्या तहसीलदारांना देण्यात आलेले आहे. सदरील निवेदनावर सुमारे 40 शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदरील सर्वे न थांबवल्यास आंदोलनाचाही इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.