राजकीयआपला जिल्हा
अखेर रमेशराव आडसकर यांचा राष्ट्रवादी मध्ये अधिकृत प्रवेश…..!

बीड दि.२२ – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीमध्ये अस्वस्थ असलेले जिल्ह्याचे जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी अखेर अजित दादा पवार यांचे नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादीमध्ये आज अधिकृत प्रवेश केला.
मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये रमेश आडककर यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, नवाब मलिक यांच्यासह अन्य नेत्यांची उपस्थिती होती. रमेश आडसकर यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधल्याने बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठया घडामोडी होण्याचे चिन्ह आहेत.
मागच्या कांही दिवसांपासून रमेश आडसकर यांची अजित पवार यांच्याशी वाढलेली जवळीकता प्रवेशाची नांदीच होती.