#Social
अनुकंपा नोकरीसाठी वारसाचा हक्क अबाधित, नाव बदलास मान्यता….!

छत्रपती संभाजीनगर दि.२६ –
सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असणारे पंडित जाधव मयत झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने अनुकंपा नेमणुकीसाठी अर्ज केला असता पत्नीचे नाव अनुकंपा नेमणुक प्रतीक्षा यादीत समाविष्ट करण्यात आले, परंतु अनुकंपा नेमणूक दिली नाही सन २००५ नंतर शासनाने नेमणुकीवर निर्बंध लादले दरम्यानच्या काळात पत्नीचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त झाल्याने त्याच्या पत्नीचे नाव अनुकंपा अनुकंपा यादीतून वगळण्यात आले असता मयताचा मुलगा प्रदीप पंडितराव जाधव यांनी अनुकंपा नेमणुकीचा अर्ज केला, त्याचा अर्ज आईचे नाव प्रतीक्षा यादी समाविष्ट असल्याने व अन्य वारसाचे नाव बदलाची तरतूद प्रचलित धोरनात नसल्याचे कारण नमूद करून अर्जदार प्रदीप यांचा अनुकंपा नेमणुकीचा अर्ज नामंजूर करण्यात आला असता.
अर्जदार प्रदीप पंडितराव जाधव यांनी अॅड. हनुमंत पांडुरंग जाधव यांच्यामार्फत माननीय प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपिठ औरंगाबाद येथे मुळ अर्ज दाखल करून अनुकंपा नेमणुकीची मागणी केली,
सदर प्रकरणात अर्जदार यांच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की आईचे नाव ४५ वर्षे होण्यापूर्वीच मुलाने अनुकंपा नेमणुकीसाठी प्रतीक्षा यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता तो कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नामंजूर करण्याचा अधिकार नाही प्रमाणे विशिष्ट परिस्थितीत अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी वारसाच्या अदलाबदल मान्य असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील पूर्ण पिठाने कल्पना विलास ताराम वि. महाराष्ट्र शासन इतर या प्रकरणातील न्यायनिर्णयाचा संदर्भ अॅड. हनुमंत पांडुरंग जाधव यांनी आपल्या मागणीच्या पृष्ठयार्थ दिल्याने मा. प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजी नगर मॅटचे न्यायिक सदस्य न्या.ए. एन. करमरकर यांनी एक महिन्यात अनुकंपा तत्वाच्या प्रतीक्षा यादीत मुलगा अर्जदार प्रदीप जाधव याचे नाव समाविष्ट करण्याचा आदेश दिला कर्मचारी वारला तेव्हा पत्नीने अनुकंपा नेमणुकीचा अर्ज केला होता व नेमणूक मिळाली नसेल तर वारस मुलगा सज्ञान झाल्यानंतर पत्नीला नेमणूक मिळाली नसेल तर मुलाला नोकरी मिळणे उचित होईल असे संबंधित कुटुंबाने ठरविले तर चालेल असे निरीक्षण माननीय खंडपीठाने नोंदवून वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावरील नेमणुकीच्या प्रतीक्षा यादी मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी प्रदीप पंडितराव जाधव यांचा अर्ज मंजूर करण्यात आला
सदर प्रकरणात अर्जदार प्रदीप जाधव यांच्या वतीने अॅड. हनुमंत पांडुरंग जाधव तर शासनाच्या वतीने सादरकर्ता अधिकारी अॅड. हांगे यांनी काम पाहिले.
अर्जदार यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभाग सेवेत कार्यरत असताना दिनांक ०३/०२/२००४ रोजी मयत झाले सलग २१ वर्षानंतर अनुकंपा नेमणुकीचा मार्ग सुकर झाला आहे. माननीय न्यायालयाने विधी विविध निर्णयाचा दाखला घेऊन नाव समाविष्ट करून अनुकंपा नेमणूक मुलास देण्यासाठी आईच्या जागी मुलाचे नाव समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.