आरोग्य व शिक्षण
जि. प. तरनळी शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप…..!

केज दि.२७ – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेतील इ. सातवी वर्गातील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.यावेळी पुढील दिशा काय असावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी “क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले” यांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संपत्ती सुदाम सरवदे, उपाध्यक्षा सीमा सुधीर मोहिते, राजाभाऊ दत्तात्रय कदम (अपग्रेड मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी) यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.इ.सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप कार्यक्रमावेळी ज्ञानरुपी शिदोरीचा आपण उपयोग करून या स्पर्धेच्या युगात आपण यश मिळवावे.कधीही वाईट विचार करु नये, वाईट वर्तन करु नये.आपण सतत प्रयत्न करावेत.असे आपल्या प्रास्ताविकात श्री कदम यांनी सांगितले. इ.१ ली ते इ.७ वी या शाळेत शिकत असताना विद्यार्थ्यांना आलेले अनुभव व शिकायला काय मिळाले? याबाबत इ.७ वी वर्गातील प्रणव नवनाथ कांबळे, श्रध्दा संपत्ती सरवदे, प्रियंका अशोक देटे,सिमा धनराज मोहिते, मयुरी मेघराज मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बाळासाहेब भिल्लु राठोड, भारत बाबुराव हांगे, गिताताई जीवराज अंडील, श्रीमती सोनाली भारतराव भुमकर, सीमा सुधीर मोहिते यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भारत बाबुराव हांगे यांनी केले. सोनाली भुमकर यांनी आभार मानले.