आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

बीड येथे शिक्षकांचे बेमुदत उपोषण….!

6 / 100 SEO Score
बीड दि.२८ –  जिल्हा परिषद मध्ये प्राथमिक पदवीधर पदावर कार्यरत असलेल्या भाषा व सामाजिक शास्त्र विषयाच्या 74 प्राथमिक पदवीधर शिक्षकांनी गणित व विज्ञान विषयांमध्ये रूपांतरण करण्यात यावे या मागणीसाठी आज दिनांक 28/4/2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
             संबंधित शिक्षक हे गेल्या आठ महिन्यापासून गणित /विज्ञान विषयात समावेश करावा म्हणून जिल्हा परिषद बीड कडे मागणी करत आहेत. तसे प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी कार्यालायामार्फत जिल्हा परिषदेकडे 8 महिन्यांपूर्वी दाखल केलेले आहेत. बीड जिल्हा परिषद मध्ये भाषा व सामाजिक शास्त्र विषयाचे शिक्षक अतिरिक्त असून गणित व विज्ञान विषयाच्या जवळपास 400 पेक्षा जास्त जागा शिल्लक आहेत. त्यामुळे गणित व विज्ञान या विषयासाठी शिक्षक उपलब्ध व्हावेत व अतिरिक्त शिक्षकाचे प्रमाण कमी व्हावे या हेतूने शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संबंधित शिक्षकांनी ही मागणी केली आहे.
                महाराष्ट्रातील सातारा, जालना, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या इतर जिल्हा परिषदानी गणित / विज्ञान विषयामधे रूपांतरण प्रकिया स्वतः हून करून दिलेली असताना बीड जिल्हा परिषदने मात्र या विषयी दप्तर दिरंगाईचे धोरण आखलेले आहे. या विषय रूपांतरणमुळे 2025 च्या बदली प्रक्रियेमध्ये कसल्याही प्रकारच्या शासन नियमाचे उल्लंघन होत नसून 74 प्राथमिक पदवीधर शिक्षकांपैकी जे शिक्षक बदली पात्र आहेत त्यांची शंभर टक्के बदली होणारच आहे. फक्त त्यांचा पहिला विषय बदलून नवीन विषयात त्यांची बदली होणारच आहे. तसेच शासनावरती कसल्याही प्रकारे आर्थिक भार या प्रक्रियेमुळे पडणार नसून कोणालाही वेतन फरक दिला जाणार नाही. तरीही जिल्हा परिषद बीड ने गेल्या आठ महिन्यापासून मा. शिक्षण संचालक, पुणे यांनी विषय बदल करता येईल असे मार्गदर्शन केलेले असतानाही हा प्रश्न प्रलंबित ठेवलेला आहे.
             मागच्या आठ महिन्यापासून हा प्रश्न न सोडवल्यामुळे संबंधित शिक्षकांनी मा. उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल केली असता मा. उच्च न्यायालयाने दिनांक 03/04/2025 रोजी झालेल्या सुनावणीत दोन आठवड्यात जिल्हा परिषद प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत मा. शिक्षण संचालकांच्या मार्गदर्शनानुसार हा विषय बदल करून देण्याबाबत आदेश दिलेले आहेत. तरी देखील जिल्हा परिषद प्रशासनाने या आदेशाकडे सविस्तर दुर्लक्ष केल्यामुळे संबंधित शिक्षक हे दिनांक 28/4/2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर उपोषणास बसलेले आहेत. मा. जिल्हाधिकारी साहेब, बीड व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, जिल्हा परिषद, बीड यांनी तात्काळ या विषयाची दखल घेऊन संबंधित विषय रूपांतरणाचा प्रश्न सोडवावा अशी विनंती बीड जिल्ह्यातील बीएससी पदवी उत्तीर्ण असलेल्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या वतीने केलेली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close