#Educationआपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

स्वामी विवेकानंद शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार….!

6 / 100 SEO Score
केज दि.२ जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [ माध्यमिक विभाग ] या शाळेमध्ये दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे, सचिव जी. बी. गदळे, सहसचिव उपेंद्र कोकीळ, कोषाध्यक्ष फजिलोद्दीन काजी, नारायण अंधारे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे, स्वयंअर्थसहायित शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत घाडगे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब तिडके, प्राचार्य हनुमंत सौदागर, सेवानिवृत्त शिक्षक श्री. डोईफोडे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे आदी उपस्थित होते.
          शाळेतील विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती पात्र एकूण ३३, एन एम एम एस शिष्यवृत्तीधारक १४, एमटीएस ऑलंपियाड मधील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीतील एकूण ६१ विद्यार्थी तसेच इयत्ता ५ वी ते ९ वी वर्गातील गुणानुक्रमे आलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
                ५ वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी- वैभवी इतापे, अनुज चाळक, वैष्णवी नागरगोजे, वैष्णवी केदार, ओम मुळे, अनुज शिंदे, शिवम कोरडे, गौरंग मुळे, श्याम तांबवे, शिवांशू मुंडे इत्यादी. ८ वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी- हिंदवी यादव, कैवल्य मोरलवार, श्रेयश जगदाळे, अक्षरा चव्हाण, पार्थ यादव, आदित्य डोईफोडे, प्रति गवळी, अनुष्का काकडे, सुयश बडे, सत्यानंद खरमाटे, शुभम केदार, जयराज कांबळे, ओम आठरे, सोहम चौरे, शर्वरी मिसाळ, रोहन चाटे, हर्षदा शेळके, स्वराली बारगजे, समर्थ सारूक, श्रेया गुंड, जयंत सौदागर, परेश तांदळे, आरव कांबळे इत्यादी.
              एमटीएस ऑलंपियाड राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थी- हिंदवी यादव राज्यातून दुसरी, कैवल्य मोरलवार जिल्ह्यातून दुसरा, आर्या लटपटे जिल्ह्यातून सहावी तसेच इतर २१ गोल्ड मेडल, ३६ सिल्वर मेडल मिळविलेल्या एकूण ६१ विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
एन एम एम एस तसेच सारथी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी- कैवल्य मोरलवार, जयराज कांबळे, आदित्य डोईफोडे, शिवम घोडके, श्रावणी सपाटे, अनुष्का काकडे, योगेश केदार, सोहम चौरे, साईराज खोडसे, हर्षदा शेळके, गौरी देशमुख, सोहम घाटूळ, रोहित देशमुख, समीक्षा देशमुख इत्यादी.
          नृत्य स्पर्धेतील विजेता संघ- अपूर्वा सोनवणे, श्रेया धपाटे, संस्कृती गायकवाड, सृष्टी अडसूळ, राजनंदिनी सोनवणे, श्रद्धा काकडे, श्रावणी लोंढे, नंदिनी सपाटे, किशोरी मुळे, श्रुती सावंत, तेजस्विनी कापरे, प्राची ढोबळे इत्यादी. शाळेच्या मंत्रिमंडळातील उत्कृष्ट मंत्री पुरस्कार- इयत्ता सहावीतील विद्यार्थीनी गुंजन घोळवे उत्कृष्ट मुख्यमंत्री तसेच पूर्वा सोनवणे उत्कृष्ट शिक्षणमंत्री. तसेच याप्रसंगी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शाळेतील सर्व शिक्षकवृंदांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
              याप्रसंगी जीवन विकास शिक्षण मंडळ या संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे मुख्याध्यापिका तसेच शिक्षक वृंद यांच्या वतीने सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव जी. बी. गदळे बोलताना म्हणाले, या स्पर्धेच्या युगामध्ये पालकांनी देखील विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, कारण केवळ शाळेचा संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक विकास देखील महत्त्वाचा आहे. संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे याप्रसंगी म्हणाले, संस्था ही केवळ संस्थेचे पदाधिकारी अथवा शिक्षक यांच्यावर चालत नाही तर पालक वर्गांचे देखील सहकार्य महत्त्वाचे असते. तेंव्हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.
             कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे यांनी मानले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close