हवामान

आठवडाभर आधीच मान्सूनची हजेरी….!

9 / 100 SEO Score
बीड दि २५ – केरळात नैऋत्य मोसमी पावसाने यंदा नियोजित वेळेपेक्षा तब्बल आठवडाभर आधीच जोरदार एंट्री घेतली असून भारतीय हवामान विभागाने अधिकृत घोषणा करत मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची आनंदवार्ता दिली आहे. 2009 नंतर पहिल्यांदाच मान्सून इतक्या लवकर आला आहे. 1 जूनच्या आसपास पोहचणारा मान्सूनने यंदा 23 मे रोजीच केरळमध्ये हजेरी लावली आहे.
               मान्सून हा वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाला असून केरळमध्ये वेळेआधीच दाखल झाल्याने राज्यात कधी पाऊस येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसामुळे लोकांचे हाल झाले आहेत.
              दरम्यान, महाराष्ट्रातही मान्सून लवकरच पोहोचण्याची शक्यता आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून वातावरणात पावसाच्या आगमनासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागांत पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close