क्राइमआपला जिल्हा

परराज्यातील पीडितेची सुटका, तिघांवर गुन्हा दाखल….!

6 / 100 SEO Score
बीड दि.३१ – शहरातील उच्चभ्रू  वस्तीमध्ये AHTU पथकाचा छापा टाकून एका आंटीसह दलाल ताब्यात घेतला असून  परराज्यातील एका महिलेची सुटका करण्यात आली आहे.
                बीड शहरातील जालना रोडवरील एका कॉलनीतील आपार्टमेंट मध्ये एक महिला व एक पुरुष परराज्यातील महिला आणून तिचे कडुन वेश्या व्यवसाय करून घेतात अशी गोपनीय माहिती AHTU  पथक प्रमुख API वर्षा व्हगाडे यांना मिळाली होती. त्यावरून अपार्टमेंट मध्ये AHTU पथक बीड यांनी डमी ग्राहक व दोन पंचांसह सापळा रचून रेड केली. सदर ठिकाणी पश्चिम बंगाल येथील मुर्शिदाबाद, कोलकत्ता येथील एक पिडीत महिला हीचेकडून शकुंतला सुरेश राऊत ही दलाल महेश मोहनराव चांदणे, मुमताज नासिर शेख हीचे मदतीने  स्वतःचे भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. यामध्ये मुमताज नसीर शेख कामासाठी महिला पुरवत असे व दलाल महेश चांदणे हा त्याचे रिक्षा क्रमांक MH- 23 AR 0509 यातून मुलींची ने आण करून शकुंतला राऊत हिच्याकडे महिला पुरवत असे.
             सदर प्रकरणी या तिघांवरही अनैतिक मानवी प्रतिबंध कायदा कलम 03,04,05,06 या अन्वये व भारतीय न्याय संहिता कलम 143 (2) अन्वये पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून ऑंटी शकुंतला राऊत व महेश चांदणे यास अटक करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणातील आरोपी क्रमांक 01 व 02 हे दोन्ही आरोपी सराईत असून यापूर्वी  शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे 2021 व 2022 मध्ये  पिटा कायद्यांतर्गत तसेच IPC 324,427,138 अन्वये गुन्हे दाखल आहेत.
             सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, पोलीस उपाधीक्षक सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास  गात, AHTU पथक प्रमुख API वर्षा व्हगाडे, पुरुष अंमलदार संजय सुरवसे, पोह अशोक शिंदे, पोह प्रदीप येवले, महिला हवालदार अनिता माने, पोह मनीषा खरमाटे यांनी केली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close