जिल्ह्यातील ४ शहरांसह मोठ्या ४० गावांमध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्टसाठी तपासणी अभियान– मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार
दिनांक 14 ते 16 सप्टेंबर या कालावधीत होणार अभियानाची अंबलबजावणी
बीड, दि. 11- जिल्ह्यातील पाटोदा , शिरूर कासार, धारूर वडवणी या ४ शहरात व सर्व तालुक्यातील लोकसंख्येने मोठा असलेल्या ४० गावात कोरोना संसर्ग ( covid-19 ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी, किरकोळ होलसेल विक्रेते, भाजीपाला-फळभाज्या विक्रेते, दूधविक्रेते, बँक कर्मचारी, पेट्रोलपंप कर्मचारी आणि कन्टेनमेंट झोन मधील नागरिक यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात येणार असून यासाठी तपासणी अभियान राबवण्यात येणार आहे, याबाबत कार्यवाहीचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत सदर अभियान या ४ शहरांमध्ये व ४० गावांमध्ये 14 ते 16 सप्टेंबर 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यापूर्वी जिल्ह्यातील बीड, गेवराई , अंबाजोगाई, परळी, माजलगाव , केज व आष्टी याठिकाणी मोठ्या संख्येने तपासणी करण्यासाठी मोहीम राबवण्यात आल्या आहेत
अभियानच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीसाठी संबंधित तालुक्याचे तहसीलदार, गट विकास अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी , नगर परिषदांचे मुख्याधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि पोलीस अधिकारी या सर्व प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करून कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत.
मोहीम राबविण्याताना अँटीजन तपासणी केंद्र सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० वा. पर्यंत सुरु राहणार आहे
अभियानाची अशी होणार कार्यवाही……
प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी पार पाडावी व एकमेकामध्ये समन्वय ठेवावा असे सूचित करण्यात आले आहे . गर्दी होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येऊन संपुर्ण कृती नियोजन करण्यात आले असून नियोजन करण्याकरीता यापूर्वी बीड शहरातील अँटीजन तपासणी मोहिमेच्या यशस्वी नियोजनाची व आदेशांची माहितीदेखील देण्यात अाली आहे.
या सर्व मोहीम होणाऱ्या शहर व मोठ्या गावांच्या ठिकाणी व्यापारी, किरकोळ होलसेल विक्रेते, भाजीपाला-फळभाज्या विक्रेते, दूधविक्रेते, बँक कर्मचारी, पेट्रोलपंप कर्मचारी यांचे तपासणीकरीता स्वतंत्रपणे बुध उभारणी केली जाईल.यासाठी नियंत्रण कक्षामधून पुर्ण मोहिम कालावधीत सनियंत्रण ठेवावे. तसेच सर्व डेटा एन्ट्री नियंत्रण कक्षामधून विहित वेळेत पुर्ण करावी, पॉझिटिव्ह रुग्णांची डेटा एन्ट्री रुग्णांचा पत्ता, मोबाईल क्रमांक याची खात्री करावी.
तसेच कन्टेनमेंट झोनमधील नागरीकांची तपासणी करण्याकरिता शाळा, महाविद्यालय, सभागृह हे कन्टेनमेंट झोनमधीलच निवडण्यात येत असून झोनमधील नागरिक तपासणीसाठी बाहेर येऊ नये. शाळा, महाविदयालय अथवा सभागृह नसेल तर खूले मैदान, मोकळी जागा (लोकवस्तीपासुन थोडया अंतरावर) कन्टेनमेंट झोनमध्येच निश्चित करण्यात येणार आहेत
शासकीय यंत्रणांच्या कामकाजाचे नियोजन…….
अभियानाच्या कार्यवाहीसाठी शासकीय यंत्रणांच्या कामकाजाचे वाटप करण्यात आले असून यानुसार तपासणी केंद्राची स्थाननिश्चिती तहसीलदार व गटविकास अधिकारी यासह मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी हे करतील
तर नायब तहसिलदार बुधवरील गर्दी तसेच कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा काळजी घेणार आहेत. वैद्यकिय अधिकारी यांची बुथवरील सर्व नियोजन करण्याची जबाबदारी आहे.प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बुथवर आलेल्या व्यापा-यांचे नाकातील स्वावाचे नमुने घेतील व
दुसरे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी किट वर तपासणी करतील व यांना आरोग्य कर्मचारी त्यांना सहाय्यक म्हणुन काम करतील.आरोग्य कर्मचारी बुथवर आलेल्या व्यक्तींची नोंदणी व फॉर्म भरणे.आरोग्य सहाय्यक बुधवरील नोंदणी झालेले फॉर्मस दर तासाला संबंधित नियंत्रण कक्षात देतील.
तपासणीसाठी आलेल्या व्यक्तींना सामाजिक अंतर ठेवुन रांगेत उभे करण्याकरीता पोलिसासोबत शिक्षक काम करणार आहेत . दोन आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्णांना वेगळे करणे व पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णवाहिकेद्वारे कॉविड केअर सेंटर (सी.सी.सी.) च्या ठिकाणी पाठविण्याकरीता समन्वय अधिकारी यांना मदत करतील प्रत्येक बुधबर वॉर्ड बॉय बुथची साफ-सफाई, बायोमेडीकल वेस्टेज संकलित करून वैद्यकिय अधिक्षक यांच्या सुचनेनुसार वाहतुक करणे. तसेच बुथ प्रमुखांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करतील. जिल्हाधिकारी बीड यांच्या मान्यतेने या अभियानाची कार्यवाही करण्यात येत असून या आदेशाची अवाज्ञा करणा-या व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंडसंहिता १८६० (४५) याच्या कलम १८८ शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल असे निर्देश देण्यात आले आहेत.