महाराष्ट्र

मल्टीस्टेट संदर्भात खा. रजनीताई पाटील यांनी मांडली परखड भूमिका….!

9 / 100 SEO Score
केज दि. ८ – दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मल्टीस्टेट बँकाच्या घोटाळ्यां विषयीच्या महत्वपूर्ण बैठकीत सहभागी होऊन खा. रजनीताई पाटील यांनी मल्टीस्टेट बँकाच्या गैरकारभाराने आर्थिक नुकसान झालेल्या व जीवन संपवलेल्या खातेदार, ठेवीदारांच्या मदतीसाठी परखडपणे भूमिका मांडली.
                    याविषयी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आहे. यावेळी जलद गतीने चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करून बाधीत खातेदारांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन बैठकीचे अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा आणि चौकशी समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी खा. रजनीताई पाटील यांना दिल्यामुळे ठेवीदार व खातेदार यांच्या आशा पल्लवित झाल्या असून त्यांनी खा. रजनीताई पाटील यांचे आभार मानले आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close