राजकीय

निवडणूक आयोगाने घेतलेली एकतर्फी भूमिका घातक – खा. रजनीताई पाटील…..!

6 / 100 SEO Score
केज दि. १३ – राज्यसभेच्या खासदार संसदरत्न, कायम सामाजिक व सर्वसामान्य नागरिकांचे विविध विषय अभ्यासपूर्ण आणि आक्रमकपणे संसदेत मांडणाऱ्या काँग्रेसच्या खा. रजनीताई पाटील
यांनी काल इंडिया आघाडीच्या  आंदोलनात आक्रमक भूमिका घेतली.
               निवडणूक आयोगाने घेतलेली एकतर्फी भूमिका ही लोकशाहीला घातक असून काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी अतिशय महत्वाच्या मुद्याला हात घातला असून यासाठी विरोधी बाकावरील सर्व खासदार या आंदोलनात सामील झाले होते.
        राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून  बीड च्या खासदार रजनीताई पाटील या आंदोलनात होत्या. अक्षरशः सरकारने पोलिसांच्या दडपशाही ने हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु खा. रजनीताई पाटील यांनी महिला खासदार असताना देखील या विरोधाला न जुमानता अडवण्यासाठी टाकलेले बॅरिगेट ढकलून देत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु भेटण्यासाठी जात असताना, इंडिया आघाडीतील खासदारांना पोलिसांकडून अडवण्यात आले आणि ताब्यातही घेण्यात आले. तरीही त्या मागे हटल्या नाहीत.
       मत चोरीच्या विरोधात मोठे आंदोलन केले गेले. मतमोजणीत पारदर्शकता, EVM + VVPAT ची अनिवार्य पडताळणी आणि मतदार याद्यांतील फेरफार थांबवण्याच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.यावेळी खासदार रजनीताई पाटील आक्रमक झाल्या.
ही लढाई राजकीय नाही ही लढाई लोकशाही, संविधान आणि ‘एक व्यक्ती, एक मत’ या अधिकाराच्या संरक्षणाची आहे ही भूमिका घेतली. लोकशाहीची होत असलेली मुस्कटदाबी  विरोधात मोर्चा आक्रमक झाला आणि यात  खा. रजनीताई पाटील यांनी पुढाकार घेतला.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close