क्रीडा व मनोरंजन

बीड जिल्हा युवक महोत्सवाचे गुरुवारी उद्घाटन….! 

6 / 100 SEO Score
बीड / गेवराई, दि. १० – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीड जिल्हा युवा महोत्सव दि. ११ व १२ सप्टेंबर रोजी  र.भ. अट्टल महाविद्यालयात होणार आहे.
                  उद्घाटन समारंभास  कुलगुरू प्रा. विजय फुलारी हे उपस्थित राहणार आहेत . समारंभाच्या अध्यक्ष स्थानिक गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित हे असणार आहेत. महाविद्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी (दि.११) सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होईल. या  महोत्सवात  ८० महाविद्यालयातील सुमारे पाचशे विद्यार्थी कलावंतांचा सहभाग निश्चित झाला आहे. हे विद्यार्थी कलावंत २१ कला प्रकारामध्ये सहभागी होऊन आपल्यातील कला गुणांचे सादरीकरण करणार आहेत.
 उद्घाटन कार्यक्रमापूर्वी सकाळी ८ ते १० या वेळेत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता सृजनरंग या मुख्य रंगमंचावर  प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडेल. सकाळी ११:३० वाजेपासून पाच रंगमंचांवरून स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये भारतीय शास्त्रीय तालवाद्य, लोक वाद्यवृंद, भारतीय शास्त्रीय नृत्य, लोक आदिवासी नृत्य, भारतीय शास्त्रीय सूरवाद्य, भारतीय शास्त्रीय गायन, नाट्यसंगीत, सुगम गायन भारतीय, सुगम गायन पाश्चात्य, समूह गायन भारतीय, समूह गायन पाश्चात्य, पाश्चात्य वाद्य वादन, एकांकिका, प्रहसन, मुकाभिनय, मिमिक्री, वक्तृत्व, वादविवाद, प्रश्नमंजुषा, रांगोळी स्पर्धा असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाला वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच बीड जिल्ह्यातील अनेक रसिक-श्रोते उपस्थित राहतील. तरी या जिल्हा युवा महोत्सवासाठी गेवराई शहर आणि तालुक्यातील रसिक, प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा आणि सहभागी कलावंतांचा उत्साह द्विगुणीत करावा असे आवाहन महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ संचालक कैलास आंभूरे व प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांनी केले आहे.
        दरम्यान, युवा महोत्सवचा पारितोषिक वितरण व समारोप समारंभ शुक्रवारी (दि. १२)  दुपारी चार वाजता होणार आहे. या पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि गेवराई तालुक्याचे भूमिपुत्र श्री. अरविंद जगताप यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष  अमरसिंह पंडित हे असणार आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close