आपला जिल्हाराजकीय

येवता सर्कलमध्ये परिमळा विष्णू घुले यांचे नाव अग्रस्थानी…..!

9 / 100 SEO Score

केज दि.१३ –  तालुक्यातील सात गटांपैकी नवीनच झालेल्या येवता गटाचे आरक्षण जाहीर झाले असून सदरील गट हा ओबीसी महिला साठी आरक्षित झाल्याने मागच्या अनेक वर्षांपासून सदरील भागामध्ये मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे विष्णू घुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सुविद्या पत्नी परिमळा विष्णू घुले यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणावर मतदार त्यांच्या पाठीशी असल्याने येवता सर्कलवर विष्णू घुले यांचा दबदबा कायम राहण्याचा विश्वास येवता सर्कलमधील नागरी व्यक्त करत आहेत.

             भाजपाचे युवा नेते विष्णू घुले हे मागच्या अनेक वर्षांपासून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या कुटुंबीयांशी जवळीक साधून आहेत. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्याबरोबरही त्यांनी काम केले असून त्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्याही निवडक कार्यकर्त्यांपैकी विष्णू घुले हे एक आहेत. विष्णू घुले यांनी येवता सर्कलची निर्मिती होण्याअगोदर पासूनच त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर सामाजिक काम केलेले असल्याने घराघरांमध्ये त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. ते स्वतः टाकळी गावचे एक उत्कृष्ट सरपंच म्हणूनही राहिलेले आहेत तर त्यांची पत्नी परिमळा घुले ह्या केज पंचायत समितीच्या सभापती म्हणून राहिलेल्या असताना सर्वसामान्य नागरिकांची कामे मोठ्या प्रमाणावर केलेली आहेत.             विष्णू घुले मित्र मंडळाच्या वतीने तालुक्यामध्ये त्यांचे मोठे काम असून कामाचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जाते. आणि याच राजकीय, सामाजिक कामाच्या जोरावर नागरिकांशी ते जवळीक साधून आहेत. टाकळी पंचायत समिती गणातील प्रत्येक गावातील आणि घराघरातील हजारो नागरिकांना त्यांनी मोफत देवदर्शनासारखे उपक्रम राबवले असल्याने विष्णू घुले यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अतिशय आपुलकीचा आहे. आणि म्हणूनच येवता सर्कलमध्ये ही ते काम करत असताना घराघरातील व्यक्तींशी जिव्हाळा त्यांनी निर्माण केलेला असून येत्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये याचा त्यांना नक्कीच फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. परिमळा विष्णू घुले नावाने जिल्हा परिषद सदस्य म्हणून निर्विवाद आपले नाव कोरणार असा विश्वास येवता जिल्हा परिषद सर्कल मधील मतदार मोठ्या प्रमाणावर व्यक्त करू लागलेले आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close