#Electionआपला जिल्हाराजकीय
सरोजिनी दादासाहेब ससाणे यांच्या नावाची चर्चा….!

केज दि.१३ – तालुक्यातील चिंचोली माळी जिल्हा परिषद सर्कल हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी जाहीर झाले असल्यामुळे अतिशय चुरशीची लढत सदरील सर्कल मध्ये होण्याची चिन्हे दिसू लागलेली आहेत. मात्र मागच्या अनेक महिन्यांपासून सदरील सर्कलमध्ये दादासाहेब ससाने यांच्या माध्यमातून एक सामाजिक जाण असलेला चेहरा चर्चेत असल्याकारणाने त्यांच्या सुविद्य पत्नी सरोजिनी ससाने यांचे नाव चिंचोली माळी सर्कल साठी दावेदारी सिद्ध करताना दिसत आहे.
सरोजिनी दादासाहेब ससाने ह्या मागच्या काही वर्षांपूर्वी केज पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून राहिलेल्या आहेत. तर दादासाहेब ससाने हे संपूर्ण तालुक्यामध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर असतात. चिंचोली माळी सर्कलमध्ये ओबीसी प्रवर्गातील मतदान हे मोठ्या प्रमाणावर असल्याने सदरील सर्कल हे ओबीसी महिलेसाठी राखीव राहिले आहे. आणि याचाच फायदा सरोजिनी ससाने यांना होऊ शकतो असे बोलल्या जात आहे. दादासाहेब ससाने यांनी मागच्या काही महिन्यांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या कामाला गती दिलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक विश्वासू कार्यकर्ते म्हणून दादासाहेब ससाने यांच्याकडे पाहिल्या जाते आणि म्हणूनच त्यांना केज विधानसभेचे प्रभारी नेमलेले आहे.
सरोजिनी ससाने ह्या उपसभापती असताना त्यांनी महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबवून तालुक्यातील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोठे प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे चिंचोली माळी सर्कलमधून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली तर त्यांना मतदारांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळू शकतो असे बोलल्या जात आहे.