#Social

शनिवारी वार्ता समुहाचा अठरावा  वर्धापन दिन…..!

अंबाजोगाई दि.4 – गेल्या 18 वर्षापासुन बीड जिल्ह्यात सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून नावारूपास आलेले आणि समाजातील वास्तव परिस्थितीची मांडणी करून लोकाभिमुख ठरलेल्या दैनिक वार्ता समुहाचा 18 वा वर्धापन दिन सोहळा येत्या शनिवार, दि.7 मार्च 2026 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येत आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने जगभरात नावलौकिक प्राप्त असलेल्या एबीपी माझा मराठीचे व एबीपी हिंदी न्युजचे मुख्य संपादक राजीव खांडेकर व भारतातील प्रसिद्ध उद्योजक रावसाहेब घुगे यांची प्रमुख उपस्थित असणार आहे. तर वर्धापन दिनाच्या निमित्ताने दिल्या जाणार्‍या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये नगर भूषण पुरस्कार हा जळगाव येथील अप्पर पोलिस अधिक्षक अशोकराव नखाते, सदभावना पुरस्कार प्रगतशील शेतकरी व उद्योजक गौतमचंद सोळंकी यांना तर युवा गौरव पुरस्कार हा पुणे येथील युवा उद्योजक सुशिल शंकरराव गाडवे यांना जाहिर करण्यात आला. त्यासोबतच अंबाजेागाई येथील उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे व मुंबई येथील उपजिल्हाधिकारी गणेशराव पवार यांना त्यांच्या उत्कृष्ट  महसुली सेवेबद्दल सन्मानित केले जाणार आहे. त्यासोबतच अंबाजोगाई शहर आणि परिसरामध्ये ज्यांनी नावलौकिक असे कार्य केले आहे. त्यांचा ही सन्मान सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत केला जाणार असल्याची माहिती वार्ता समुहाचे संपादक परमेश्‍वर गित्ते यांनी दिली आहे.
        बीड जिल्ह्याच्या पत्रकारितेमध्ये गेल्या 18 वर्षापासुन अखंडीत पणे व सातत्याने दैनिक वार्ता या वृत्तपत्राच्या वतीने समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील पैलुंवर प्रकाशझोत टाकण्यात येतो. त्या सोबतच सामाजिक स्तरावर काम करत असताना जे विविध घटक आहेत. त्यांना पटलावर आणून व्यवस्थेमार्फत न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पत्रकारिता करीत असताना सामाजिक भान राखूनच प्रश्‍न मांडलेले आहेत. सामाजिक जाणिवा व संवेदना जपत वार्ता समुहाने सामाजिक दायित्व अदा केलेले आहे. त्यानुषंगाने 18 वर्षे पुर्ण करून 19 व्या वर्षात पर्दापण केले आहे. 18 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने यंदाही वर्धापन दिन सोहळा, जाहिर सत्कार, व पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. 7 मार्च 2026 रोजी अंबाजोगाई येथील मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह नगर परिषद येथे सायंकाळी 5.30 वाजता आयोजित केला आहे. या वर्धापन दिन सोहळ्यासाठी जगभरात नावलौकिक प्राप्त मराठी वृत्तवाहिनी असलेल्या एबीपी माझा व एबीपी हिंदी न्युज चे मुख्य संपादक राजीव खांडेकर तसेच भारतातील प्रसिद्ध उद्योजक आणि बाप आयटी कंपनीचे संस्थापक रावसाहेब घुगे हे प्रमुख आकर्षण असणार आहे. आणि त्यांचे विचार हे अंबाजोगाईकरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई पिपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी हे असणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाईचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, बृहन्मुंबई महानगर पालिकेचे उपमुख्यअभियंता इंजि.नवनाथ घाडगे पाटील, परभणी येथील कार्यकारी अभियंता इंजि.प्रसाद लांब, परळी वै.च्या नगराध्यक्षा पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, धारूरचे नगराध्यक्ष बालासाहेब जाधव, केजच्या नगराध्यक्षा सिताताई बनसोड, जिवन शिक्षण समुह केजचे संस्थापक अध्यक्ष हारूणभाई इनामदार, अभियांत्रिकी महाविद्यालय अंबाजोगाईचे प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी, केज येथील गंगामाऊली शुगरचे व्हा.चेअरमन हनुमंत मोरे, अ.भा.फिजीशिएशन असो.अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ.नवनाथ घुगे, आयएमए अंबाजोगाईचे अध्यक्ष राहुल धाकडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर वार्ता समुहाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे विविध पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. ज्यामध्ये 2026 चा नगरभूषण पुरस्कार हा जळगाव येथे अप्पर पोलिस अधिक्षक असलेले अशोकराव नखाते यांना जाहिर करण्यात येत आहे. अशोकराव नखाते यांचे शालेय शिक्षण अंबाजोगाईच्या भूमीतच झाले आहे. विविध शासकीय पदांवर काम त्यांनी केले आहे. ज्यामध्ये ग्रामसेवक, सहाय्यक निबंधक आणि पोलिस उपअधिक्षक व आता अप्पर पोलिस अधिक्षक या पदापर्यंत त्यांची वाटचाल राहिलेली आहे. सदभावना पुरस्कार 2026 हा अंबाजोगाई येथील  प्रगतशिल शेतकरी व उद्योजक गौतमचंद सोळंकी यांना जाहिर करण्यात आला आहे. सोळंकी हे गेल्या 50 वर्षापेक्षा अधिक काळापासून अंबाजोगाई शहरामध्ये नवजीवन मशिनरी स्टोअर्सच्या माध्यमातून ग्राहक सेवेत आहेत. त्यासोबतच प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा आवर्जुन उल्लेख केला जातो. नाविन्यपुर्ण प्रयोग हा त्यांचा छंद आहे. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून चांगली सेवा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सामाजिक कार्यात सुद्धा त्यांचे योगदान आहे. बँकिंग क्षेत्रातही त्यांची वाटचाल राहिलेली आहे. युवा गौरव पुरस्कार सुशिल शंकरराव गाडवे यांना जाहिर करण्यात आला आहे. सुशिल गाडवे हे अंबाजेागाईचे भूमिपुत्र असून त्यांनी पुणे शहरामध्ये शुन्यातून विश्‍व निर्माण केले आहे. हजारो लोकांना त्यांच्या स्वप्नातील घरे उपलब्ध करून दिली आहेत. रिअल स्टेट व बांधकाम क्षेत्रातील यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यासोबतच अंबाजोगाई शहरामध्ये गेल्या 2 वर्षापासुन उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले दिपक वजाळे यांनी सामाजिक भान राखत आपली महसुली सेवा दिलेली आहे. तसेच मुंबईचे उपजिल्हाधिकारी असलेले गणेश पवार यांनीही महसुल खात्यात वेगवेगळ्या पदांवर काम करून उपजिल्हाधिकारी पदापर्यंत वाटचाल केलेली आहे. दोन्ही उपजिल्हाधिकारी महोदयांच्या सेवेचा सन्मान व गौरव म्हणून त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. त्यासोबतच अंबाजोगाई शहर व तालुक्यात विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी यश संपादन केले आहे. अशांचाही सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. ज्यामध्ये अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयाचे नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ.ज्ञानोबा दराडे, नेत्ररोग तज्ञ डॉ.एकनाथ शेळके, स्वाराती रूग्णालयातील सर्जन डॉ.नितीन चाटे,  मधुमेहतज्ञ डॉ.अतुल शिंदे, मिसेस महाराष्ट्र स्पर्धेच्या उपविजेत्या डॉ.सुनिता गणेश तोंडगे, पोलिस निरिक्षक शरद जोगदंड, इंजि. वरद सत्येंद्र बर्दापुरकर, ज्ञानदिप अ‍ॅकॅडमीचे संचालक प्रा.दत्ता दराडेे यांचा समावेश आहे.
तर कार्यक्रमाच्या प्रारंभी सांस्कृतिक कार्यक्रमात महागायक सुभाष शेप,आसाराम जोशी, प्रदिप चोपने, शाहीर गणेश मामा काळे व इतरांचा सहभाग असणार आहे. तरी कार्यक्रमास  अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिक-बंधु -भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वार्ता समुहाचे संपादक परमेश्‍वर गित्ते, अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ, तालुका पत्रकार संघ अंबाजोगाई, अ.भा.मराठी पत्रकार परिषद, अंबाजोगाई, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अंबाजोगाई, अ.भा.मराठी डिजीटल पत्रकार संघ, अंबाजोगाई, गुडमॉर्निंग ग्रुप, अंबाजोगाई , व्हाईस ऑफ मिडीया शाखा अंबाजोगाई यांनी केले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close