क्राइम
डी डी बनसोडे
September 17, 2020
होळ जवळ चौघांवर प्राणघातक हल्ला
समाजकंटकांना तात्काळ अटक करण्याची मागणी
केज दि.१७ – धारुर येथील मुस्लिम धार्मिक कार्य करणाऱ्या व अंबाजोगाई येथे मौतीसाठी जाणाऱ्या चौघांवर होळ ता.केज येथे प्राणघातक हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करण्याची मागणी समस्त मुस्लिम समाज, किल्लेधारूर जि.बीड यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
दि.१६ (बुधवार) रोजी रात्री दहाच्या सुमारास धारुर येथील मुस्लिम धार्मिक कार्य करणाऱ्या व अंबाजोगाई येथे मौतीसाठी जाणाऱ्या धारूर येथील चौघांची गाडी बंद पडली. दरम्यान ते चौघेही तिथे थांबले असता चौघांवर होळ ता.केज येथे सात ते आठ जणांनी प्राणघातक हल्ला केला. यात दोघांची प्रकृती गंभीर असुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. यावेळी संबंधित लोकांनी जातीवाचक शिविगाळ करत जखमीं जवळची रोख रक्कम पळवली. अशा या प्राणघातक हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करुन कारवाई करावी नसता मुस्लिम समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात येतो.
सदरील निवेदनाच्या प्रतिलिपी पोलिस निरिक्षक धारुर, युसुफवडगाव यांनाही देण्यात आली आहे.
दरम्यान युसुफ वडगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती एपीआय आनंद झोटे यांनी दिली असून पोलीस हल्लेखोरांचा तपास करत आहेत.