क्राइम
केज पोलीसांची अकरा हातभट्ट्यावर कारवाई !
पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी केली तीन पथकांची नेमणूक
केज दि.२७ – पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी लॉक डाउन मध्ये पोलीस स्टेशन हद्दीत धाडसी कारवाई करत बाराशे लिटर गावठी दारू तयार करण्याचे रसायन नष्ट करून देशी दारूसह सुमारे ४० हजार रू. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.
केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दि. २७ सप्टेंबर रोजी पोलिस स्टेशन हद्दतील अवैद्य धंद्यावर कठोर कारवाई करण्यासाठी तीन वेगवेगळे पथके तयार केली होती. एका पथकात स्वतः पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, दुसऱ्या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे होते. सदरील पथकांनी बोरगाव, नांदूरघाट, हनुमंत पिंप्री, डोणगाव, येवता व केज या ठिकाणी धाडी टाकून १२२० लिटर दारू बनविण्याचे रसायन, १११ दारू बॉटल्स आणि १७ लिटर हातभट्टीची तयार दारू असा एकूण ४० हजार ४४८ रु. मुद्देमाल ताब्यात घेत दारू बनविण्याचे रसायन नष्ट केले.
सदर प्रकरणी मुंबई दारू बंदी कायद्याचे कलम ६५ ई नुसार कल्याण बापु शिंदे, रुक्मीणबाई बापु शिंदे आणि सुबराव मोतीराम पवार रा. बोरगांव, बालाबाई बबन शिंदे, निलाबाई पोपट शिंदे रा.नांदुरघाट, सुग्रीव रुपला शिंदे, राजेंद्र लाला शिंदे रा.हनुमंत पिंपरी, शारुबाई शिवाजी काळे, उषाबाई भिमा काळे रा. डोणगांव, विकास लिंबाजी निर्मळ रा.येवता आणि रंजना राहुल शिंदे रा.फुलेनगर केज यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबत बालकृष्ण मुंडे, दिनकर पुरी, अशोक नामदास, अमोल गायकवाड, जिवन करवंदे, धनपाल लोखंडे, वाहन चालक हनुमंत गायकवाड यांचा समावेश होता.