देशविदेश

दिवसभरातील ठळक बातम्या……!

???? अनेक देशांबरोबर चीनचे परराष्ट्रसंबंध कमालीचे ताणले गेले आहेत. ऑस्ट्रेलियाचाही या देशांच्या यादीमध्ये समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर आता हिंदी आणि पॅसिफिक महासागरामधील चीनचा वाढता धोका लक्षात घेता ऑस्ट्रेलियाने भारताबरोबर काम करण्याची तयारी दर्शवली आहे. ऑस्ट्रेलियाचा संरक्षण मंत्री लिंडा रेनॉल्ड्स यांनी यासंदर्भातील माहिती दिल्याचे वृत्त पीटीआयने दिलं आहे.
???? डब्लूएचओचे प्रमुख टैड्रॉस एडहेनॉम घेबरेयेसस म्हणाले कि, १२ कोटी टेस्ट किट ६ महिन्यांच्या आता तयार करण्यात येईल. या सर्व टेस्ट किट्स संघटनेच्या भागीदारांसोबत बनवण्यात येईल आणि ११३ देशांमध्ये उपलब्ध केले जातील. याची किंमत ५ डॉलर म्हणजेच भारतीय चलनांमध्ये ४०० रुपयांपेक्षाही कमी आहे. तसेच काही तासांऐवजी १५ ते ३० मिनिटात रुग्णांचा अहवाल समजेल. यामुळे संक्रमण थांबविण्यास मदत होईल, असेही डब्लूएचओने सांगितले.
???? उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्वतः ट्वीट करत आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, मी कोणाच्या संपर्कात नव्हतो. मात्र, त्याआधी जे आले आहेत, त्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी.
???? मास्कबाबत कॅलिफोर्निया विद्यापीठात अभ्यास करण्यात आला. Medical Xpress मध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. खोकला आणि शिंकेतून बाहेर पडणाऱ्या संसर्गजन्य शिंतोड्यांमुळे हवेत विषाणूचा प्रसार होण्याचा धोका जास्त आहे आणि अशा पद्धतीने संसर्ग पसरण्याचा धोका कमी करण्यासाठी सर्जिकल मास्क आणि N95 मास्क जास्त प्रभावी आहे.
???? बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून, तेथील राजकारण अधिकच गरम झाल्याचे दिसत आहे. निवडणुकीअगोदरच यूपीएला मोठा झटका बसला आहे. माजी केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पार्टी(रालोसपा)चे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी यूपीएची साथ सोडत. बसपाला सोबत घेऊत तिसरी आघाडी निर्माण करणार आहे. याबाबत त्यांनी आज घोषणा केली आहे.
???? कोरोणासाठी teicoplanin नावाच्या ग्‍लायकोपेप्‍टाइड एँटीबॉयोटिक औषधामुळं कोरोनावर मात करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये आणखी आशा पल्लवित झाल्या आहेत. हे औषध एकदोन नव्हे तर, तब्बल दहापट अधिक प्रभावी असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
???? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून सध्या प्रचाराची रणधुमाळी माजली आहे. नासा मधील महिला अंतराळवीर ४१ वर्षीय कॅथरीन रुबिंस हिच्यासाठी मात्र या निवडणूक मतदानाचा अनुभव यावर्षी वेगळा असणार आहे. कारण कॅथरीन ऑक्टोबरच्या मध्याला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनसाठी अवकाशात उड्डाण घेणार आहे. आणि विशेष म्हणजे जबाबदार नागरिक आणि लोकशाहीत महिला भागीदारी राखण्यासाठी ती अंतराळ स्टेशन मधूनच तिचा मतदानाचा हक्क बजावणार आहे. अंतराळातून मतदान करणारी कॅथरीन ही बहुदा पहिलीच महिला अंतराळवीर ठरणार आहे.
???? कॅट क्यू व्हायरस (सीक्यूव्ही) असून हा विषाणू चीन आणि व्हिएतनाममध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. भारतात हा विषाणू पसरू शकतो, अशी भीती आयसीएमआर म्हणजेच इंडियन काऊन्सील ऑफ मेडीकल रिसर्चने व्यक्त केली आहे.
???? निवडणूक आयोगाने बिहारमधील लोकसभेच्या एका जागेसह विविध राज्यांमधील विधानसभेच्या ५६ जागांसाठी पोटनिवडणुकीच्या तारखेची घोषणा केली आहे. छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, नागालॅण्ड, ओदिशा, तेलंगणा व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close