क्राइम

केज तालुक्यात विनयभंगाच्या दोन घटना

केज दि.१ – शहरातील बसस्थानक परिसरात व तालुक्यातील रामेश्वरवाडी (हांगेवाडी ) शिवारात विनयभंगाच्या वेगवेगळ्या दोन घटना घडल्या आहेत.
          तालुक्यातील रामेश्वरवाडी (हंगेवाडी) शिवारात दि.३० रोजी एक महिला सायं.६ च्या दरम्यान शेतातून शेतातून येत असताना सुनील गणपत हांगे याने सदरील महिलेस कुठे चालली आहेस? असे विचारात हाताला धरून विनयभंग केला. केज पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
      तर केज शहरातील बसस्थानक परिसरात दि.1 ऑक्टोबर रोजी 9.40 वा. स्वतःच्या बांधकामावर पती पत्नी पाणी मारत असताना सुरेश मस्के (रा.बसस्थानक परिसर केज) नावाचा व्यक्ती तिथे गेला व तुमच्या पायऱ्या बसस्थानकाच्या जागेत येत आहेत असे म्हणून शिवीगाळ करूत फिर्यादी महिलेच्या पतीला मारहाण केली. दरम्यान फिर्यादी महिलेच्या हाताला धरून रोडवर ढकलत विनयभंग करत जिवे मारण्याची धमकी दिली. सदरील प्रकरणी केज पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पो.कॉ. रुक्मिणी पाचपिंडे ह्या करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close