मुंबई | राज्य सरकारने आता महिलांना मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. सरकारने त्याबाबतचं पत्रक प्रसिद्ध केलं आहे.
महिलांना मुंबई लोकलमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत तर संध्याकाळी 7 नंतर पुढे प्रवास करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी क्यूआर कोडची आवश्यकता नाही.दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून विविध राजकीय पक्षांनी लोकल सुरु करण्याची मागणी केली होती. अखेर महिलांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.