आपला जिल्हा

होडी पलटी होऊन तिघांचा दुर्दैवी अंत

वडवणी तालुक्यातील घटना

  बीड दि. 23 – वडवणी तालुक्यातील खळवट लिंमगाव येथील नदी वरील चपू वरून प्रवास करत असताना नदीत चपू पलटी होऊन पाच पैकी तिघेजण पाण्यात बुडाले आहेत.तर दोघाना उपचारार्थ दवाखान्यात हलवण्यात आले आहे. अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे होडी पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
      गुरुवारी शेतातील कापूस वेचणीचे काम उरकून भारत रामभाऊ फरताडे, सुषमा भारत फरताडे, आर्यन भारत फरताडे ( पती पत्नी आणि मुलगा) व पूजा तसेच अंकिता नाईकवाडी पाचजण हे सर्व रा. खळवट लिंमगाव येथील आहेत. गावकऱ्यांची पन्नास टक्के शेती ही नदीच्या पलीकडे असल्याने येथील शेतकरी, शेतमजूर यांना चपूवर बसून प्रवास करावा लागतो. नदी मधून प्रवास करण्याकरिता 70 ते 80 चपू या ठिकाणी आहेत. या चपू वर जीव मुठीत धरून हा प्रवास दररोज सुरु आहे. आता पर्यंत या ठिकाणी अनेक दुर्घटना घटना घडलेल्या आहेत. अशीच गुरुवारी सायंकाळी चपू वरून घरी परत असताना आई, मुलगा आणि भाची यांचा चपू  पाण्यात पलटी होऊन दुर्दैवी अंत झाला तर अन्य दोघे सुदैवाने बचावले. रात्रीची वेळ असल्याने बुडालेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी अडथळे येत होते.
               दरम्यान प्रशासनाने योग्य वेळी पुलाचा बंदोबस्त केला असता तर, अशी दुःखाची वेळ आली नसती असे येथील सरपंच भारत निसर्गध यांनी सांगितले. स्वतः तहसीलदार रेखा स्वामी यांनी मतदान करण्यासाठी नागरिकांना रस्ता नव्हता तेव्हा त्याना होडीवर बसून मतदान करण्यास प्रवृत्त करून मतदान करून घेतले होते. यावर कौतुकाची जिल्हाधिकारी यांनी धाप पण दिली होती. मात्र जीव घेणाऱ्या पुलाकडे दुर्लक्ष केले. वडवणीच्या गटविकास अधिकारी श्रीमती कांबळे  यांनी देखील या होडीवर ये-जा चा अनुभव कसा असतो तो घेतला होता. मात्र त्या जीव घेण्या पुलाकडे कोणी डोकावून ही पाहिले नाही. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
——————————————
रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु असताना रात्री 11 च्या सुमारास मायलेकरांचे मृतदेह सापडले तर एका मृतदेहाचा शोध सकाळी लागला.
——————————————

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close