केज तालुक्यातील धनेगाव येथे आज पालक मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मांजरा धरणातील पाणीसाठ्याच्या जलपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी पालकमंत्री श्री. मुंडे म्हणाले, धरणातील पाणी वाया जावू नये यासाठी आवश्यक बाबी तात्काळ करण्यात याव्यात.मांजरा धरणातून बीड सह उस्मानाबाद, लातूर जिल्ह्याची तहान भागवली जाते. मागच्या कालखंडात हे धरण कोरडे पडले होते. यावर्षी अपेक्षित पाऊस झाल्याने धरण शंभर टक्के भरत आले आहे.
——————————————–
संभाजी ब्रिगेड चे निवेदन……!
दरम्यान मांजरा धरण हे केज तालुक्यात असले तरी सर्व प्रशासकीय कारभार हा लातूर येथून चालत असल्याने धरण परिसरातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे धरण क्षेत्रावर सदरील कार्यालय सुरू करण्यात यावे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड च्या वतीने तालुकाध्यक्ष राहुल खोडसे व इतर कार्यकर्त्यांनी ना.धनंजय मुंडे यांना निवेदन देऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.