क्रीडा व मनोरंजन
तीनच दिवसांपूर्वी झालं वडिलांचं निधन, मुलाने केले मैदानात अभिमानास्पद अभिवादन !
आयपीएल दरम्यान अनेकदा गंमतीचे, सुखाचे तसंच भावूक क्षण पहायला मिळतात. असाच एक भावूक क्षण काल शारजाहच्या मैदानावर पहायला मिळाला.
किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मनदीप सिंगने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात दमदार फलंदाजी केली. मनदीपने 56 चेंडूंमध्ये 66 रन्सची खेळी केली. अवघ्या 3 दिवसांपूर्वी वडिलांचं निधन झालं होतं आणि हे दुःख विसरत त्याने आपलं कर्तव्य बजावलंय. त्याची ही उत्तम खेळी वडिलांसाठी श्रद्धांजली होती.
पंजाब आणि हैदराबाद विरूद्धच्या मॅचला सुरुवातीला मनदीपच्या वडिलांचं आधीच्या रात्री निधन झालं होतं, मात्र या सामन्यातही मनदीप मैदानात उतरला होता.पंजाबची टीम बॅटिंगसाठी उतरली तेव्हा मनदीप सिंग केएल राहुलसोबत बॅटिंगसाठी आला. 14 बॉलमध्ये 17 रन करुन मनदीप यावेळी माघारी परतला होता.