देशविदेश

सेल्फी घेणं आमिरला पडलं महागात…….!

पोलिसात तक्रार

 लालसिंग चड्ढाच्या चित्रीकरणासाठी अभिनेता आमिर खान गाजियाबाद मधील लोनी येथे आला. शूटिंग संपल्यावर विना मास्क, सोशल डिस्टसिंग न पाळता तो आपल्या  चाहत्यासोबत सेल्फी होता. मात्र हे सेल्फी घेणं आमिरला चांगलंच महागात पडलं आहे.

लोनी विधानसभेचे आमदार नंद किशोर गुर्जर यांनी कोविडचा प्रोटोकॉल मोडल्याप्रकरणी आमिर खानवर गुन्हा दाखल केला आहे. गुर्जर यांनी आरोपच नाही तर त्यानंतर पोलीस तक्रारही केली आहे.‘रील लाईफ’ हिरोने ‘रियल लाईफ’ मध्येसुद्धा ‘हिरो’ असायला हवं आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी.  ‘विलेन’सारखं आपलं जीवन धोक्यात  घालू नये, असं नंद किशोर गुर्जर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईसारख्या कोरोना हॉटस्पॉट ठिकाणाहून येऊन नियम न पाळता चित्रीकरण करता आणि गर्दी जमवतात हे सहन केलं जाणार नसल्याचंही गुर्जर यांनी म्हटलं आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close