महाराष्ट्र
मनसेने उभारला ”माणुसकीचा फ्रीज”…….! वाचा काय आहे संकल्पना…….!
मुंबई | मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एका नवा उपक्रम सुरु केला आहे. मुंबई शहरात कधीच कोणाला उपाशी पोटी झोपावं लागू नये म्हणून मनसेनं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी पुढाकार घेऊन या उपक्रमाला सुरुवात केलीये. ‘माणुसकीचा फ्रीज’ असं या अनोख्या उपक्रमाचं नाव आहे.
नागरिकांनी घरात शिजवलेलं अन्न, फळं, बिस्किटं यापैकी जे काही आपल्याकडे असेल ते स्वेच्छेने या फ्रीजमध्ये आणून ठेवायचंय. गरजूंना तसंच ज्यांना भूक लागली त्यांनी येऊन हे अन्न घेऊन जायचंय, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे.नितीन सरदेसाई यांच्या सांगण्यानुसार, ही संकल्पना यशस्वी झाली तर कोणालाही उपाशी पोटी झोपावं लागणार नाही. मुंबईच्या स्पिरिटवर आम्हाला विश्वास असून या उपक्रमाला लोकांचा सहभाग नक्की मिळेल.
मनसेच्या माहीममधील कार्यालयात या फ्रीजचं उद्घाटन करण्यात आलंय. शिवाय येत्या काळात असे अजून फ्रीज मनसेतर्फे सुरू केले जाणार आहेत.