महाराष्ट्र

…….तर राजकारण सोडून हिमालयात जाईल……!

पुणे | कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदार संघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल, जर निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन, असं भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

चंद्रकांत पाटील यांच्या वर्षपूर्ती कार्यालय अहवालाचं प्रकाशन पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.मागील वर्षी विधानसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हा मला अमित शाह यांनी सांगितले की, आपको विधानसभा निवडणूक लढनीं पडेगी. अमितभाई माझा अजून विधान परिषदेचा एक महिना शिल्लक आहे मला कुठे यात अडकून ठेवता?, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

अमितभाईंनी आग्रह धरला तुला विधानसभा लढवायची असून आपको पुना मैं कोथरूडसे लढना है असंही सांगितलं. तसेच मी त्यानंतर माझ्या नावाची या मतदार संघातून घोषणा झाली आणि त्यानंतर आजवर माझ्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. मला मिळालेल्या शिकवणीनुसार कोणी ही कितीही आरोप प्रत्यारोप केले तरी आपण आपले काम करीत रहायचे आणि तेच मी आजवर करीत आलो, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close