आरोग्य व शिक्षण
शाळांना पाच दिवसांच्या दिवाळी सुट्ट्या घोषित
बीड – राज्यात कोव्हीड-19 या महामारीच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील शाळांना दिवाळी सणासाठी पाच दिवसांच्या सुट्ट्या घोषित करण्यात आल्या आहेत.शाळा प्रत्यक्षात सुरू करणे शक्य नसल्याने दिनांक 15 जून,2020 पासून शैक्षणिक वर्ष सुरू करून स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त व संबंधित शाळा व्यवस्थापन समिती यांना दिनांक 15 जून,2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रदान करण्यात आले आहेत. तसेच शासनाच्या दिनांक 22 जुलै,2020 च्या परिपत्रकातील सूचनेनुसार इयत्ता ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे.माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्टया ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, तसेच एकूण कामाचे दिवस २३० होणे आवश्यक आहे. इयत्ता १ ली ते ५ वीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील शाळेतील शिक्षकांच्या कामाचे दिवस एकूण२०० व इयत्ता ६ वी ते ८ वीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील शाळेतील शिक्षकांच्या कामाचे दिवस किमान २२० होणे आवश्यक आहे. शालेय अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या करण्याच्या दृष्ट्टीने दिनांक १२ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत दीवाळी सन असल्याने शाळाांना सुट्टी घोषित करण्यात येत आहे. या कालावधीत शाळां मार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन पध्दतीने सुरूअसलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील. असे आदेश उपसचिव (म.शा.) राजेंद्र पवार यांनी निर्गमित केले आहेत.