आरोग्य व शिक्षण
23 नोव्हेंबर ला शाळा सुरू ? 10 वी 12 वी ची परीक्षा मे महिन्यात……! मात्र मुख्यमंत्र्यांची मंजुरी बाकी…….!
मुंबई – बहुतांश पालक जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत शाळा प्रत्यक्ष सुरू करू नयेत या मानसिकतेत असताना मागच्या चार महिन्यांपासून शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण मंत्र्यांकडून वेगवेगळे वक्तव्य येत आहेत. आणि याचाच एक भाग म्हणून राज्यात शाऴा आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात एसओपी तयार करण्यात आला असून त्याबाबत केवळ मुख्यमंत्र्यांकडून मंजूरी मिळणं बाकी असल्याचे म्हटले आहे.
एसओपी मंजूर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर इयत्ता 10वी 12 वीच्या परीक्षा मे महिन्यातच होतील अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली आहे. शाळा सुरू करण्याआधी पालकांची परवानगी देखील घेतली जाणार आहे. मात्र पालक वर्गातून वेगळाच सूर निघत असून जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवण्यास असमर्थता दाखवत आहेत.