राजकीय
फाशी घेण्याची वेळ आली होती……एवढं एका माणसानं छळलं.……!
जळगाव | मला अक्कल शिकायला चालले होते. मी अख्खं आयुष्य भारतीय जनता पार्टीला दिलं. माझा मुलगा गेला तरीही मी भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिलो. पण मला एका माणसाने छळलं, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे.
फाशी घेण्याची वेळ आली होती इतकं भाजपमधल्या एका व्यक्तीने मला छळलं, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय. ते जळगावमध्ये बोलत होते.
मी भल्याभल्यांना मुख्यमंत्रीपद दान करत असतो. त्यामुळे असं समजा की उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीचा दावेदार असलेलं हे पद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिलं, असा टोला खडसेंनी फडणवीसांना लगावला आहे.
भाजपाने एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला केलं. एका व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं. मला या पक्षातून छळ करत ढकलण्यात आलं. त्यामुळे यंदा भाजपचं सरकार हे कोणामुळे आलं नाही, असं म्हणत खडसेंनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं.