राजकीय
हा तर मानसिक विकलांगतेचा तमाशाच……..!
मुंबई | जोपर्यंत सदोष मनुष्यवधातले महात्मा सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही सगळे दंडास काळ्या फिती लावून काम करु. हा तर मानसिक विकलांगतेचा तमाशाच आहे, असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर टीका केलीआहे.
2018 साली महाराष्ट्रात एका माय-लेकरांनी आत्महत्या केली होती. तात्कालीन सरकारने ते प्रकरण दडपले. पोलिसांनी या प्रडकरणातील एका आरोपीस पकडले व त्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी सुरु असताना भाजपचे अधिकारी वेडेखुळेच बनले.नशीब की, याप्रश्नी भाजपाने राज्यव्यापी जेल भरो, साखळी उपोषण यांसारखे प्रयोग सुरु केले नाहीत.
मनाने भरकटलेले अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष ट्रम्प अमेरिकेत जसे वागत आहेत तसेच ‘डिट्टो’ महाराष्ट्रतील भाजपा पुढारी वागु लागले आहेत, असं म्हणत शिवसेनेनी विरोधकांना टोला लगावला आहे.