महाराष्ट्र

”यासाठी” अर्णव गोस्वामींना दिवाळीपूर्वी अटक करण्यात आली……?

ऍड. हरीश साळवे यांचा दावा

मुंबई | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.

अर्णब गोस्वामी यांच्या तातडीच्या अंतरिम जामिनावरील शुक्रवारची सुनावणी झाली. न्यायालयाला सोमवारपासून दिवाळीची सुट्टी असल्याने शनिवारी केवळ तातडीच्या अंतरिम जामिनावर सुनावणी घेण्याचं स्पष्ट करण्यात आलं. अर्णब गोस्वामी यांच्या वतीने हरिश साळवे यांनी युक्तिवाद केला.

अर्णब यांनी आपल्या वाहिनीद्वारे सरकारच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे अर्णब यांची अटक हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचा दावाही हरिश साळवे यांनी केलाय.न्यायालयाला दिवाळीची सुट्टी लागेल आणि अर्णब यांना जामीन मिळू शकणार नाही, हे सरकारला माहित आहे.  त्यामुळेच अर्णब यांना धडा शिकवण्यासाठी अटक करण्यात आली, असा युक्तिवाद साळवे यांनी केला.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close