मुंबई | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. त्याचप्रमाणे चित्रपटगृह उघडली, रेल्वे सुरु केली पण मंदिर का उघडली नाहीत? असा सवालंही अण्णांनी सरकारला विचारलाय.
महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी आहे. थांबला तर खटारा, अशी जोरदार टीका अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारवर केलीये.
अण्णा हजारे म्हणाले, लोकपालनंतर लोकायुक्त कायदा तयार करायचा असून या कायद्याचा मसुदाही तयार करण्यात आलाय. यासाठी मी या सरकारमधील अनेक मंत्र्यांना पत्रं लिहिली होती. परंतु मुख्यमंत्री सोडून मला इतर कुणाचंही उत्तर आलं नाहीये.
मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये या कायद्यासंदर्भात कोरोना परिस्थितीनंतर पाहू असं म्हटलंय. हा कायदा जर आणला नाही तर मी पुन्हा आंदोलन करणार असल्या इशारा देखील अण्णांनी दिला आहे.