महाराष्ट्र

एकीकडे फटाके न वाजवण्याचे आवाहन तर दुसरीकडे फटाक्यांच्या दुकानांना परवानगी……..!

मुंबई  – रोषणाई करा, फराळ बनवा, पण सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना केलं आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद  साधला. यावेळी ते बोलत होते.

मात्र एकीकडे फटाके वाजवू नका म्हणून आवाहन करायचे अन दुसरीकडे फटाक्यांच्या दुकानांना परवानगी द्यायची याने प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल का ? हा प्रश्न आहे 

पुढे बोलताना ते म्हणाले की, मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही. राज्य सरकार फटाक्यांवर बंदीही घालू शकते. मात्र, बंदी आणि कायदे करुनच जीवन सुरु ठेवायचं का, याचा निर्णय नागरिकांनीच घ्यावा, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.पूर्वीच्या काळात फटाके वाजवण्यात गंमत होती. मात्र, अलीकडच्या काळात लोकसंख्या आणि प्रदूषण वाढले आहे. फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषण होऊन कोरोनाचा धोका वाढत असेल तर आपण फटाक्यांवर बंदीऐवजी स्वत:वर काही बंधने घालून घेऊ शकत नाही का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुरामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण आतापर्यंत केलेली सगळी मेहनत वाया जाईल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

मात्र एवढ्या वर्षी तरी किमान फटाक्यांच्या दुकानांना परवानगी न देणे उचित ठरले असते.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close