महाराष्ट्र
अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालू………!
बीड – कोरोना संसर्ग रोगामुळे गेले 9 महिन्यापासून राज्यातील विठुरायाचं मंदिर बंद आहे. येत्या कार्तिकी एकादशीला मंदीराची सर्व दारे उघडून कमीतकमी निर्बंध घालून यात्रा होऊ द्यावी,अशी मागणी वारकरी संप्रदाया़ने केली आहे.
शासनाने आषाढी यंत्रणेप्रमाणेच निर्बंध घातल्यास वारकरी संप्रदाय येणाऱ्या सर्व निवडणूकांवर बहिष्कार टाकेल, असा इशारा वारकरी संप्रदायाच्या बैठकीत देण्यात आला आहे.कार्तिकी एकादशीला सकाळी बारा वाजेपर्यंत वारकऱ्यांना सोशल डिस्टन्स पाळून प्रदक्षिणा करु द्यावी, अशी विनंती वारकरी संप्रदायाकडून पाठवण्यात येणाऱ्या प्रस्तावात केली जाणार आहे.
कोरोनाचे नियम पाळून वारकऱ्यांना यात्रेला येऊ द्यावे, प्रत्येक मठात 50 भावीकांना उतरण्याची परवानगी द्यावी, अशीही विनंती प्रस्तावात केली जाणार आहे.