क्राइम
पोलिसांसमोर हजर होण्यास ”या” अभिनेत्रीचा नकार…….!
मुंबई | मुंबई पोलिसांनी अभिनेत्री कंगणा राणावत आणि तिची बहिण रंगोलीला समन्स बजावण्यात आला होता. त्यासाठी कंगणा आणि रंगोली या दोघींना आज हजर राहण्यास सांगण्यासही सांगण्यात आलेलं. मात्र दोघांनीही पोलीस ठाण्यात हजर राहण्यास नकार दिलाय.
आज कंगणाच्या भावाचं लग्न आहे. त्यामुळे कंगणा आणि रंगोली या दोघांनीही पोलिसांसमोर हजर राहण्यास नकार दिलाय. यापूर्वी देखील त्यांनी पोलीस ठाण्यात हजर होण्यास नकार दिला होता.
आज कंगणाच्या भावाचं लग्न आहे. आणि भावाच्या लग्नानंतरच आपण पोलिसांसमोर हजर राहू शकतो, असं या दोघींकडून सांगण्यात आलंय.
कंगणा राणावत आणि तिची बहीण रंगोली या दोघींनी सोशल मीडिया काही पोस्ट केल्या होत्या. या पोस्टमुळे समाजात दुहीचं वातावरण निर्माण झालाय असा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी त्यांनी उत्तर द्यायचं असून त्यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावला होता.