राजकीय
बिहारमध्ये शिवसेना कितव्या नंबरवर…..….?
मुंबई – भाजप-जेडीयू यांची एनडीए बिहारमध्ये मुसंडी मारताना दिसत आहे. तर शिवसेनेची कामगिरी समाधानकारक नसल्याचं चित्र आहे. 23 पैकी 21 जागांवर तर शिवसेनेच्या वाट्याला नोटापेक्षाही कमी मतं मिळाली आहेत.
शिवसेनेच्या चिन्हासमोरील बटणापेक्षा मतदारांनी ‘नोटा’चे बटण अधिक दाबले आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना o.o4 टक्के मतं मिळाल्याचं सुरुवातीच्या मतमोजणीत दिसत होतं.निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार दुपारी 1.45 वाजेपर्यंत आलेल्या निकालाच्या कलांनुसार शिवसेनेला 23 पैकी 21 जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.