महाराष्ट्र

डॉक्टरनेच केली आजाराला कंटाळून आत्महत्या…….!

सांगली – जत तालुक्यातील संख येथील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.सदाशिव व्हनखंडे (वय 66)यांनी आजाराला कंटाळून स्वत:चे पोट कापून घेत आत्महत्या केली.   डॉ. व्हनखंडे पोटाच्या विकाराने आजारी असल्याने असह्य वेदनांनी ते त्रस्त झाले होते. सोमवारी रात्री घरातील सर्वजण झोपी गेले होते. मात्र हॉलमध्ये ते एकटेच झोपले होते. पहाटेच्या सुमारास त्रास होऊ लागल्याने त्यांनी स्व:तच भुलीचे इंजेक्शन घेतले आणि पोट कापले.मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा. घरातील व्यक्तींच्या सकाळी हा प्रकार लक्षात आला; परंतु तत्पूर्वीच डॉ.व्हनखंडे यांचा मृत्यू झाला होता.

         डॉ.व्हनखंडे यांनी संखच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले होते.काही दिवस त्यांच्याकडे जत तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणूनही पदभार होता.घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी भेट दिली. उमदी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close