शेती
धोनी विकणार आता कडकनाथ कोंबड्या……..शेतीसह नव्या व्यवसायाची निवड…….!
रांची – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता महेंद्रसिंह धोनी आपले शहर रांचीत झाबुआच्या कडकनाथ कोंबड्यांची विक्री करेल. धोनीने मध्य प्रदेशातील झाबुआच्या कडकनाथच्या 2 हजार पिल्लांसाठी अग्रिम मोबदल्यासोबत झाबुआच्या आदिवासी शेतकऱ्याला ऑर्डरही दिली आहे.
कॅप्टन कूल आणि अनुभवी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सेंद्रिय शेतीसह कडकनाथ कोंबड्यांची फार्मिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रांची येथील त्यांच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापक मित्राच्या माध्यमातून झाबुआ येथील आदिवासी शेतकरी विनोद मैडा यांना 15 डिसेंबरपर्यंत आगाऊ पैसे देऊन 2 हजार कोंबडी देण्यास सांगण्यात आले आहे.