राजकीय
खेळ तर आता सुरू झालाय……थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान…..…!
मुंबई | अन्वय नाईक यांना आत्महत्येप्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. काल त्यांना अखेर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. तुरुंगातून सुटका झाल्यावर अर्णब यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
सुटकेनंतर अर्णब गोस्वामी हे आपल्या न्यूज रूममध्येही पोहोचले. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलंय. शिवाय “उद्धव ठाकरे तुमचा पराभव झालाय” असंही ते म्हणालेत. अर्णब गोस्वामी म्हणाले, “उद्धव ठाकरे तुम्ही मला जुन्या प्रकरणात अटक केली. इतकं करून तुम्ही माझी माफीही मागितली नाहीये. त्यामुळे खेळ तर आता सुरू झालाय.”
“मी आता प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरू करणार आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही उपस्थिती लावणार आहे. मी तुरूंगाच्या आत राहून वाहिनी सुरू करेन आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही,” असंही गोस्वामी म्हणालेत.