राजकीय

त्यांची अवस्था विक्रम-वेताळासारखी – निलम गोऱ्हे

मुंबई | भाजप नेते नारायण राणे यांनी दिवाळीनंतर भाजप सरकार पडणार, भाजप राज्यात दिवाळीनंतर ऑपरेशन लोटस राबवणार, असा दावा करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

            नारायण राणे दुःखी आत्मा आहेत. त्यांची विक्रम-वेताळसारखी अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका शिवसेना नेत्या नील्हम गोऱ्हे यांनी केली आहे.

नारायण राणे यांनी 12 डिसेंबरपर्यंत त्या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागावी, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.नीलम गोऱ्हे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर भाष्य करत किरीट सोमय्या यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. किरीट सोमय्या यांचं व्यक्तीमत्व पाहिलं तर त्यांचे विषय जेवनातल्या लोणच्याप्रमाणे आहेत. किरीट सोमय्या पांचट आहे हा वायकरांचा शब्दप्रयोग मला फार आवडला, असा टोला नीलम गोऱ्हे यांनी लगावला.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close