राजकीय

”त्यांच्या” डोक्यावर परिणाम झालाय, शॉक दिल्याशिवाय बडबड बंद होणार नाही……!

बीड – सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. शॉक दिल्याशिवाय त्यांचे बेताल वक्तव्य थांबणार नाहीत, असा इशारा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलाय.

त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांनी ठाण्यातील रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. त्यांची ही बडबड शॉक दिल्याशिवाय थांबणार नाही, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.ठाकरे कुटुंबीयांच्या पायाजवळ बसून सोमय्या खासदार झाले. आज ते ठाकरे कुटुंबावरच टीका करत आहेत. हा माणूस प्रचंड एहसान फरामोश आहे, अशी सडकून टीकाही गुलाबराव पाटील यांनी केलीय.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कथित जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.

दरम्यान भाजप शिवसेनेत चांगली जुंपली असून महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमय्या यांना शिखंडी म्हणून उपाधी दिली असून संजय राऊत यांनीही तोंडसुख घेतले आहे.तर सोमय्या यांनीही संजय राऊत यांना थेट आव्हान दिल्याने ऐन दिवाळीत राजकिय फटाके फुटत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close