महाराष्ट्र
मागच्या वेळेस गुपचूप लग्न उरकलं,मात्र संसार टिकला नाही…….!
बीड – रावसाहेब दानवे येऊन जाऊन बाप काढतात, दानवे यांना विचारा त्यांचे बाप कोण आहे, कोणाचे बाप, किती बाप? असा सवाल राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
दानवेंना कोणाचाही बाप काढायचा अधिकार नाही, असं प्रत्युत्तर वडेट्टीवार यांनी दिलं आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.केंद्राचा निधी म्हणजे त्यांच्या बापाचे पैसे आहेत का?, त्यांच्या बापाने कमवून ठेवले का? असं म्हणत वडेट्टीवार यांनी दानवेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
बिहारमध्ये गेल्या वेळी दुसऱ्याची बायको पळवून आणली होती. राज्यातही सकाळी सकाळी गुपचूप लग्न केलं होतं, मात्र, संसार टिकला नाही, अक्षदा पडायच्या आधीच नवरी पळाली, अशा शब्दात वडेट्टीवारांनी दानवे आणि भाजपवर सडकून टीका केली आहे.