राजकीय
भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा अशी माझी इच्छा होती…..मात्र…..!
मुंबई – एनडीए ला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर बिहारच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा नितीश कुमार विराजमान होणार आहेत. उद्या सोमवारी (दि.१६) त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. मात्र नितीश कुमार यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती असं नितीश कुमार यांनी सांगितलंय.
नितीश कुमार म्हणाले, “माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. भाजपामधून कोणीतरी मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटत होतं. मात्र भाजपाने केलेल्या आग्रखातर या पदाची धुरा सांभाळणार आहे.”
नितीश कुमार सातव्यांदा व सलग चौथ्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत. तर आजच्या बैठकीमध्ये एनडीएच्या नेतेपदी नितीश कुमार यांची निवड करण्यात आली आहे.