आरोग्य व शिक्षण

आजाराशी झुंज देत असलेल्या साळेगाव (ता.केज) येथील प्रशांतला आर्थिक मदत करण्याचे आवाहन…….! आपली मदत मोलाची ठरणार…..!

केज दि.१५ – शाळेत अव्वल नंबरवर असलेल्या प्रशांतला एका दुर्धर आजाराचा सामना करावा लागत असून दानशूर व्यक्तींनी त्याला आर्थिक मदत केली तर तो नक्कीच या आजारातून बरा होईल या अपेक्षेने त्याला मदत करण्यासाठी अनेक सर्वसामान्य लोक पुढे येत इतरांनीही मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
         केज तालुक्यातील साळेगाव येथील प्रशांत कैलास वरपे हा गावातीलच शाळेत इयत्ता 10 वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मात्र कांही दिवसांपूर्वी त्याला मेंदूचा क्षयरोग झाल्याने तो सध्या सोलापूर येथील डॉ.वळसंगकर यांच्या दवाखान्यात उपचार घेत आहे. आजार अतिशय दुर्धर असल्याने त्याला उपचारासाठी किमान 10 लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले जात आहे. मात्र घरची परिस्थिती बिकट असल्या कारणाने कुटुंबीय एवढा खर्च करू शकत नाहीत. त्यासाठी त्याला लागणाऱ्या खर्चासाठी सर्वसामान्य लोक आपापल्या परीने होईल तेवढी मदत करत आहेत.मात्र रक्कम मोठी असल्याने इतरही दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आर्थिक मदत करण्याचे आवाहन सोशेल मिडीयाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
     दरम्यान ज्या दानशूर व्यक्तींना प्रशांतच्या उपचारासाठी मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी सौ.प्रतीक्षा वरपे (वाघ) यांच्या (9067416683) या नंबरवर फोन पे/ गूगल पे च्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या परीने होणारी मदत नक्कीच प्रशांत ला आजारातून बाहेर काढण्यासाठी मोलाची ठरणार असल्याने मन मोठे करून मदत करावी.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close